Pages

Showing posts with label गुरु ठाकूर. Show all posts
Showing posts with label गुरु ठाकूर. Show all posts

Monday, 1 June 2020

तसा मी ताकास तुरही लागू दिला नव्हता...गुरु ठाकूर

तसा मी ताकास तुरही लागू दिला नव्हता...

तरी देखील छत्री मिटून ठेवताना
केवळ माझा चिंब ओला
डावा खांदा पाहत
आईच्या मुखाने पन्नास पावसाळे
एका सुरात बोलले
"आता एकदा तरी घेऊन ये तिला"

Monday, 9 April 2018

पाणीपुरी - गुरु ठाकूर


आयुष्याला द्यावे उत्तर - गुरू ठाकूर


असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…||

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची

असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…||

पाय असावे जमिनीवरती  कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना

संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…||

करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना

स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…||

** गुरू ठाकूर