ह्या blog वरील प्रकाशित कवितांचा कोणताही व्यावहारिक उपयोग केला जात नाही आहे. बालपणावर पगडा राहिलेल्या आठवणीतल्या कवितांचा संग्रह करून, इतर वाङ्मय प्रेमींनाही तो उपलब्ध करून द्यावा, हा त्या मागे प्रांजळ उद्देश आहे. प्रत्येक कवितेच्या शिर्षकामध्ये कवींचे नाव लिहिलेले आहे. येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधिताना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्कभंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. ~दिग्विजय संजय पाटील
Tuesday, 10 April 2018
Monday, 9 April 2018
स्वातंत्र्यदेवीची विनवणी - कुसुमाग्रज
पन्नाशीची
उमर गाठली अभिवादन मज करू नका।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका।।
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरू नका।।
अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका।
अंध प्रथांच्या कुजट कोठरी, दिवाभितासम दडू नका।।
जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका।।
वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे।
करतिल दुसरे बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका।।
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा।
मेजाखालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका।।
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका।
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका।।
प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे।
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका।।
पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका।।
गोरगरीबा छळू नका। पिंड फुकाचे गिळू नका।
गुणीजनांवर जळू नका।
उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वा़कडी धरू नका।।
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।।
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका।।
कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका।।
पुत्र पशुसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया।
परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडु नका।।
स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे।
सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळु नका।।
तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी।
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका।।
सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामध्ये धरा।
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालून पळू नका।।
करा कायदे परंतु हटवा जहर जातिचे मनातुनी।
एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका।।
समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका।
दासी म्हणूनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका।।
नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा।
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका।।
माणूस म्हणजे पशू नसे। हे ज्याच्या हृदयात ठसे।
नर नारायण तोच असे।
लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका।।

**कुसुमाग्रज
स्पायडरमॅनची बायको म्हटली - संदीप खरे
स्पायडरमॅनची बायको म्हटली - आमचे हे भलते चिक्कट
!
चिक्कट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुक्कट !!
चिक्कट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुक्कट !!
कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं
नवीन घरात गेले तर हो घरात नुसती जळमटं !
नवीन घरात गेले तर हो घरात नुसती जळमटं !
घाईघाईट छत जमीन झाडायचीही सोय नाही
कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही काही
सांगवत नाही !!
कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही काही
सांगवत नाही !!
एक ड्रेस घालून फिरतात...धुणं नाही...इस्त्री
नाही
झब्बा नको...सूट नको...कसली म्हणून हौस नाही !
झब्बा नको...सूट नको...कसली म्हणून हौस नाही !
कसला मेला आचरट ड्रेस...तसेच जातात भटकायला
दाढी नको...आंघोळ नको...उठून लागतात लटकायला !
दाढी नको...आंघोळ नको...उठून लागतात लटकायला !
ढिम्म बघत राहतात नुसते; पापणीसुद्धा
पडत नाही
काय नक्की मनात आहे...चेहऱ्यावरती कळत नाही !!
काय नक्की मनात आहे...चेहऱ्यावरती कळत नाही !!
असं कसं घेऊन यांना लग्न-मुंजीत जायचं सांगा
उत्सवमूर्ती बाजूला अन यांच्यासमोर लागतात रांगा
उत्सवमूर्ती बाजूला अन यांच्यासमोर लागतात रांगा
पोरं बाळं लक्ष नाही...किती रडू...किती बोलू
पेपरमध्ये रोज फोटो त्याचं काय लोणचं घालू !!
पेपरमध्ये रोज फोटो त्याचं काय लोणचं घालू !!
पोरांनाही ऑडच होतं...एकदा शाळेत गेले होते
मास्तरसमोर जाळं टांगून उलटं लोंबून बसले होते !
मास्तरसमोर जाळं टांगून उलटं लोंबून बसले होते !
बाहेरच्यांना हिरो बीरो..घरात नुसते शिराळशेठ
पुरुष मेले सगळे सारखे...घरात एक ! दारात एक !
पुरुष मेले सगळे सारखे...घरात एक ! दारात एक !
घरात मी चोविस तास...बाहेर हे वाऱ्यावर
घरी परत येईस्तोवर जीव नसतो थाऱ्यावर !
घरी परत येईस्तोवर जीव नसतो थाऱ्यावर !
लटकत जातात इकडे तिकडे..चिकटून बसतात भिंतीवर
समजा जाळं अडलं तर ? नि समजा डिंक संपला तर ?
समजा जाळं अडलं तर ? नि समजा डिंक संपला तर ?
खरं सांगू...बोलते यांना...पण मग येते माझीच कीव
दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव ? !!
दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव ? !!
अस्से हे अन अश्शी मी...नातं आमचं धाग्याचं
सोसायचं अन झेलायचं अन तरीसुद्धा भाग्याचं !!
सोसायचं अन झेलायचं अन तरीसुद्धा भाग्याचं !!
एक मात्र आहे बरं...बाहेर जेव्हा काहीच नसतं
आमचं ध्यान...कसं सांगू...मलाच येऊन चिकटून बसतं !!
**संदीप खरे
आमचं ध्यान...कसं सांगू...मलाच येऊन चिकटून बसतं !!
**संदीप खरे
तुज बघता सारा हिशेब चुकला होता- संदीप खरे
तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावास्येला चंद्र पाहिला होता ||धृ||
तो एकच झाला गुलाब अवघा लाल
जो ओठांवरती तुझ्या टेकला होता ||१||
तालात नादली तुझी पैंजणे तिकडे
हृदयाचा ठोका इकडे हुकला होता ||२||
डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा
मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता ||३||
निथळता चांदणे असह्य अंगावरती
मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता ||४||
तू मिठीत घेता श्वास थांबले होते
मज मारायचा डाव चांगला होता ||५||
पाहिले जयाने तुझे लाजरे हासू
माणूस तो आयुष्यातून उठला होता ||६||
भिननारच होते जहर तुला हे माझे
मी कवितेमधुनी दंश ठेवला होता ||७||

आयुष्याला द्यावे उत्तर - गुरू ठाकूर
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…||
नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…||
पाय असावे जमिनीवरती कवेत
अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…||
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…||
करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर
कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…||
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…||
** गुरू ठाकूर
गाणे व्यर्थची कुल थोरवी - बेहरे
तडित कडाडे उपजे काळ्या कभिन्न मेघोदरी
म्हणुनी का वीज नसे साजरी?
महाविषारी असे खरोखर नागाची ती फणी
म्हणुनी का गरलच वरचा मणी? ||१||
पंकापोटी जन्म पाऊनी सौंदर्ये शोभते
म्हणुनी का कमळ तुच्छ वाटते?
सुरासुरांनी भांडण करुनी सागरास मंथीले
म्हणुनी का अमृत हे नासले? ||२||
शिळा वाळुनी मूळ मुर्तीपरी पंढरीस नांदते
म्हणुनी का भक्ती मंदावते?
जन्मा येणे देवाहाती करणी जग हासवी
गाणे व्यर्थची कुल थोरवी...||३||
~ तडित = वीज, गरल = विष, पंक = चिखल;
~सुरासुरा =
सुर-असुर (देव-दानव); शिळा = दगड
Thursday, 5 April 2018
वेडात मराठे वीर दौडले सात - कुसुमाग्रज
वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥
"श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात"
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील"
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ३ ॥
"जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत"
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ८ ॥
Image Source -- http://anuragchivilkar.blogspot.in/2012/03/tribute-to-veer-senapati-prataprao.html
प्रेम कर भिल्लासारखं - कुसुमाग्रज
पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा,
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.
शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!
कवी – कुसुमाग्रज
कणा - कुसुमाग्रज
ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा!
कवी – कुसुमाग्रज
जालियनवाला बाग - कुसुमाग्रज
रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
“प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !”
आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !
पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास;
असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !
कवी – कुसुमाग्रज
सहानभूती - कुसुमाग्रज
उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी
प्रभादिपांची फ़ुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी
कोप-याशी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग
भोवतीचा अंधार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला
जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसांचा त्यात ही उपास
नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?
कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला
तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दीना त्या उभारुनी ऊर
म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी
खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिनबंधू वाट
आणी धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात
***
कवी – कुसुमाग्रज
Sunday, 8 November 2015
Saturday, 7 November 2015
मोहरा इरेला पडला - दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी
बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा
किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला
आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया
भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला
कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला
बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||
बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर
बोले
शूरांनो वेढा द्याया
चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील
परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला
मोहरा इरेला पडला ||२||
तोफेच्या तोंडी माथे
बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते
किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी
डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस
वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||
गोळ्यांच्या मार्याखाली
चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट
लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली
पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो
सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला
बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||
मर्दच्या मराठी फौजा
रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या
मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा
सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा
परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||
वारावर करतची वार
अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा
चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात
भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना
भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||
गरनाळी तोफा मोठ्या धुंकार
कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु
कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर
चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना
क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा
बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली
बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा
दिग्प्रांत पहा दुमदुमला
तो समय आणि ती मूर्ती
ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||
- कै. दु, आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून
- कै. दु, आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून
-
Monday, 28 September 2015
Thursday, 10 September 2015
समुद्र - दिग्विजय पाटील
समुद्र...लोक याला कितीही बोल लावतील, नावं ठेवतील,
की इतका विशाल असलेला हा समुद्र कोणाचीही तहान भागवू शकत नाही...पण मला हि त्याची निंदा
कधीही आवडली नाही. तो नक्कीच तहान भागवत नसेल, पण त्याच्याकडे ओलावा आहे. त्याच्या
किनारी एकांतात बसून पहा. तो तुम्हाला स्वतःशी बोलायला लावतो. तुमच्या चुका
तुम्हाला शोधायला शिकवतो. तुमच्यातल्या प्रेमाला वात मोकळी करण्याची तो प्रेरणा
देतो.
ह्या गोष्टींचा आणि समुद्राचा काय संबंध असावा याचं मला
नेहमीच आश्चर्य वाटत आलय. प्रेम, दुख, असूया, इर्षा, आनंद ह्या सर्व भावना
किनार्याजवळ बसून त्याच्याशी आपल्या मनातल हितगुज करत असतात. आणि तो प्रत्येकाच्या
भावना मूकपने ऐकत असतो. आपलं मन कुणाजवळ मोकळं करण्याची जी प्रत्येक मनुष्याची स्वाभाविक
गरज आहे, ती गरज तो पूर्ण करत असतो.
- दिग्विजय पाटील
- दिग्विजय पाटील
Wednesday, 1 April 2015
इतिहास की अवहेलना
आज में आपसे एक गंभीर विषय के बारेमें बात करना चाहता हूँ| यह बात हे इतिहास से की गयी अवहेलना की, यह बात हे ऐतिहासिक घटनाओं के साथ की गयी छेड़छाड़ की, यह बात हे इतिहास के महापुरुषोसे की गयी अमर्यादा की, पक्षपात की| स्कूली पाठ्यक्रम राजनैतिक सोच का पिंजर बनके रह गया है – छत्रपती शिवाजी महाराज जैसे महामानव के लिये सिर्फ एक परीच्चेद| क्या उनका महान योगदान आज बस एक औपचारिकता बन कर रह गया है?
एक सरकार सेक्युलर इमेज लेकर आती है, तो दूसरी हिंदुत्ववादी सोच देने की कोशिश करती है|
तो आपके मन में प्रश्न तो जरूर उठा होगा, आखिर इतिहास की अवहेलना की किसने? उन शासकोने, जीन्होने इतिहास में अफरातफरी करणे कि कोशिश कि, या फिर उन समाजके घटकोने जिन्हे उनके सोचके अलावा दुसरे सोच का अस्तित्व मंजूर नही|
इतिहास हमेशासे शाहोंका, शासकोका दास बनके रहा हे| वक्त-बे-वक्त शासकोने इतिहास को तोरमरोड़ कर जनता के सामने रखा|
इतिहास की एक खासियत यहभी हे की वह हमेशासे जीतनेवालोके पक्ष में रहा हे| जो जीते उन्होंने उसे अपनी तरह से मोड़ा| पहलेके साहित्य, संगीत, कला को निचोड़ा|
मूज़े इस प्रश्नका उत्तर दीजिये – क्या कृष्णनीतिका मायना आज भी वही रहता अगर महाभारत के रणसंग्राम में कौरावोंकी जीत होती? क्या चाणक्यनीति आज भी राज्यव्यवस्था और परदेशनीति का प्रदर्शक होती अगर चन्द्रगुप्त नंदवंश का विनाश करने में असफल रहता|
हमें क्या बोलना चाहिए, हमें क्या नहीं बोलना चाहिए, यहाँ तक की हमें क्या सोचना चाहिए इसकाभी नियंत्रण सदियोंसे शासकोंने किया हे| मैं मानता हूँ की यह एक तरह का मानसिक बलात्कार हे| एक शृंखलामें हम बंधे हुए हे, हमें उसे भेदना होगा| अभिमन्यु को चक्रव्यूह से निकलने का मार्ग ढूँढना होगा|
कितनी अजीब बात है की समाज के विशिष्ट घटकोंने अपने नेता के विचारोको सिर्फ और सिर्फ अपनी जातिके विचारोंतक ही सिमित किया| इसका में उदाहरण देता हूँ|
हिंदुत्ववादी कहते हे छत्रपति शिवाजी महाराज हमारे राजा थे| शिवाजी महाराज को हिन्दुस्वराज्यसंस्थापक कहके धर्मान्धोंने उनके विचारोका अपमान किया है| क्या उन्होंने स्वराज्य की स्थापना हिंदुओंके लिए की थी? जी नहीं साहब, उनके नौसेना का प्रमुख एक मुस्लिम था, हालाकि उन्हें औरंगजेब की गिरफ्त से मुक्ति दिलानेमें सहाय्य करने वाला एक मुस्लिम था| जिसके सैन्य में २५ प्रतिशत से ज्यादा इतर धर्मीय सैनिक हो, वो सिर्फ एक हिन्दू राजा कैसे हुआ?
वही बात रही महाराणा प्रताप की| राजपूतोंनें उन्हें अपना राजा बताया| वह सिर्फ राजपूतोके तारणहार थे तो उनकी फ़ौज से ज्यादा राजपूत तो अकबर की सेना में थे| अकबर का सेनापति मानसिंग तो राजपूत ही था न|
आंबेडकर को दलितोने अपना नेता बताया, तो लोहियाजिको समाजवादियोंने अपना चेहरा बताया| स्वातंत्र्यवीर सावरकर जैसे महान देशभक्त को इन राज्यकर्तावोंने तो मानो इस तरीकेसे पेश किया की वह हिंदुत्वकी रट लगानेवाले कोई दहशतवादी हो|
इन तरह की वोट बटोरनेवाली राजनीतियां एवं राजकीय अस्पृश्यता की वजह से कई महान युगपुरुषोंको सदियोंके लिए इतिहास की कलाकोठडीमें दफनाया गया|
क्या आपको लगता हें की हम अस्पृश्यता मिटानेमें सहीमे कामयाब रहे हैं? जी नहीं जनाब| राजकीय अस्पृश्यता तो अभीभी चरणसिमापे हें| दक्षिणपंथीयोंने नेहरु को इसका शिकार बनाया, तो वामपंथियोंने सावरकर, मुखर्जीको इसका शिकार बनाया|
क्यूँ प्रादेशिक राज्य जितने के बाद मूर्तिभंजकोने अजंता, एलोरा जैसे महँ शिल्पकला के राज्य को बर्बाद करने की कोशिश की? साहित्य, इतिहास और राज्यव्यवस्था इन चीजोंका सही मेल होनेकी जरुरत हें|
आज में अंबेडकरजीके विचारोंके बारेमे बोलना चाहूँगा तो मुजे दसबार सोचना पड़ेगा की कही दलितोकी भावना तो नहीं दुःख जाएगी? कुरआन के तत्वज्ञान पे बात करू तो कही मुस्लिमोंको तो आपत्ति नहीं होगी?
स्वैर विचारधारासे अपने कलम को जीवन देनेवाले लेखक की मृत्युसे ज्यादा भयानक उपहास इस जीवनमे क्या हो सकता हे? इतिहास की अवहेलना मेरे अन्दर का वह डर हे, जो मुजे अपनी भावनाओंको मुक्त करने से रोकता हे|
इतिहासमें अगर कुछ बदलाव लाना हे तो प्रथम एन महामानवोंको इस राजकीय, धार्मिक और सामाजिक गुटबाजिकी श्रुंखलासे हमें मुक्त करना होगा|
किस महाराजा ने कोनसे युद्ध मी विजय प्राप्त कि यह छात्रोसे रटवानेसे बेहतर मी मानता हुं कि उस महान व्यक्ती कि सोच क्या थी, उनके विचार क्या थे, वो जनता तक पहुंचाना बहोत जरुरी हे| इतिहास के ऊपर जो राज्यव्यवस्था का अंकुश है, उसे उठाना होगा| जिस दिन एक निष्पक्ष इतिहास आनेवाली पिढी को पढाया जायेगा, उस दिन में मानता हून कि वो भारतीय कालखंड का सुवर्णमध्य होगा|
-Digvijay.

Subscribe to:
Posts (Atom)