Pages

Saturday 14 June 2014

तत्कालची रांग.

ह्या तत्काळच्या रांगेच्या अनेक गमती-जमती असतात.जर खरी exitement म्हणजे काय हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल, तर ह्या रांगेत तुमचं स्वागत आहे.पहिल्या दहा क्रमांकानंतर जर तुम्ही उभे असाल तर मग नास्तिकालाही देव आठवतो. खेद, आनंद, वैषम्य, उत्तेजीतपणा, हुरहूर असल्या अनेक भावनांचं दर्शन ह्या अर्ध्या तासात होतं.जर प्रवास लांबचा असेल तर मग संपूर्णवेळ धाकधुक.

यातही गंमत अशी की जर तिकीट काढणारा व्यक्ती की-बोर्ड शी खेळण्यात पटाइत असेल तर ठीक, नाहीतर मग पंचाईत आहेच. कारण तुम्ही रागही करू शकत नाही, नाहीतर ज्या वेगाने करतोय तोही थांबायचा.
माझ्यासोबत हि गोष्ट नेहमी घडते. आमच्या खरगपूरचा तत्काळच्या वेळात बसणारा व्यक्ती डबल भिंगाचा चष्मा असलेला. म्हणजे काय होतं, तो हातातला फॉर्म वाचणार खालच्या भिंगाने आणि कॉम्पुटरच्या स्क्रीनमधे पाहणार वरच्या भिंगाने आणि मधली वेळ त्याची नजर स्थिर होण्यासाठी. त्यामुळे माझा नंबर पहिल्या दहामधे जरी असला तरी पूर्णवेळ धाकधूक असते. कामाचा उरकही कमी वरून, चिडचिड फार. ट्रेनचा नंबर माहित करून घेता येत नाही का, ओळखपत्रावर सही काय मी करणार, सुटे पैसे आणता येत नाही का, एक न अनेक भानगडी तो करणारच.

याच्या अगदी उलट माझ्या hometownला असणाऱ्या मॅडम. ह्या कॉम्पुटर आणि पैशाच्या हिशोभात अतिशय तरबेज. सतत हसतमुख आणि मदतीला तैय्यार. खांद्यापर्यंत मोकळे केस, केसांना बेल्ट लावलेला आणि सलवार-कमीज घातलेल्या चाळीशीतील बाई. तिथे असताना आपलंकाम होईल हि बर्यापैकी खात्री.

जर तुम्ही मनात असतं की शुभशिर्वादांनी कोणाला दीर्घायुष्य लाभतं किंवा कुणाच्या शिव्याशापांनी कुणाचं आयुष्य कमी होत, तर दोघींपैकी एकाला बह्र्पूर आयुष्य आणि दुसर्याचे काहीच वर्ष उरलेत अशी अवस्था आहे.

मला कळत नाही हे लोक बँकेमधे किंवा रेल्वे-काऊँटर वर म्हाताऱ्या लोकांना का म्हणून बसवतात? आधीच आपली लोकसंख्या अशी आहे की प्रत्येक ठिकाणी रांगच रांग. वरून ह्या म्हाताऱ्या माणसांची कॉम्पुटरशी ओळखही मर्यादितच. त्यांना त्यांच्या ठराविक कामापेक्षा वेगळी काही शंका विचारली की ते गडबडनारच. मग काय हि ब्याद म्हणून बर्याचवेळा चिडणार, काहीतरी नियम दाखवून आपली गच्छंती करणार.

तिकीट confirm आहे हे कळल्यावर जो हर्षतीशयाने चेहरा खुलतो, तो तर अवर्ननियच. बऱ्याचवेळा आपल्या अगदी पुढच्या मनुष्याचं तिकीट confirm मिळालं आणि आपल्या तिकिटावर waitingचा शिक्का लागला म्हणजे मग आपण आपल्या नशिबाला दूषणं लावणार हे नक्की. जर-तर च्या फैरी मनामध्ये झडणार. म्हणजे जर मी अजून १५ मिनिट लवकर गेलो असतो तर मला confirm तिकीट मिळालं असतं.

ज्यांना तत्काळ काढण्याचा कधी अनुभव आला नाही अशा भाग्यवंतांना हि गोष्ट माहित नसावी कि हि रांग म्हणजे काही जिवंत माणसांची रांग नसते काही पूर्णवेळ. सर्वात पहिले जो मनुष्य आला त्याने आपलं नाव एका कागदावर लिहावं आणि पुढचा कोणी आला की तो त्यानंतर नाव लिहिणार. मग पहिला दुसर्याला त्या कागदाची राखवालदारी करायला बसवून कुठेतरी फिरायला निघून जाणार, असा क्रम चालूच राहणार.  खरी जिवंत हाड-मांस असणार्यांची रांग लागते ती सकाळी ९:३० वाजता. मग खरी गंमत चालू होते. जे तिथे पूर्णवेळ उभे होते पण ज्याचं त्या कागदावर बराच खालचा क्रमांक आहे अश्या लोकांचा वेगळाच जळफळाट असतो. शेवटी त्यापैकी एखाद्याचा संयम सुटतो आणि तो बंड करून उठतो. पण त्याला घालवण्यासाठी सर्वलोक अगदी एकजूट करतात आणि त्याला हुस्कवतात. मग तो तोंडात बडबड करतच तिथून निघतो. हा उपक्रम अगदी ठरलेला.

ज्यांना हा अनुभव आलेला नाहीय त्यांनी तो एकदा जरूर घ्या. जीवनातले सर्व रस अगदी कमी वेळात ग्रहण करण्याचं हमखास स्थान म्हणजे- तत्कालची रांग.