Pages

Friday 21 February 2014

पुत्र ऐसा देगा देवा...



आपली कमतरता लक्षात घेईल इतका सामर्थ्यशाली,
भयप्रद परिस्थितीतस्वतःचा सामना करेल इतका धैर्यशाली,
जो प्रामाणिक पराभव स्वीकारताना झुकणार नाही किंचितही;

जो दिग्विजय नम्रतेने स्वीकारताना उतणार नाही, मातणार नाही,
जगही इच्छापूर्ती करताना ज्याच्या पाठीचा कना मोडणार नाही;
जो सदैव शाबूत असेल;
तुझं अथांग स्वरूप जाणून घेताना आत्मज्ञान करून घेणं
हि ज्ञानाची पहिली पायरी आहे, हे ज्याला माहित असेल;

नेऊ नकोस त्याला तू सुखी-समाधानी सुटसुटीत सरळ मार्गावर,
दे असा मार्ग त्याला संकट, खाचखळगे, आव्हानं ठायीठायी ज्यावर.
इथेह शिकू दे त्याला भोवंडून टाकणाऱ्या वादळाशी सामना करायला
आणि पराभवान खचलेल्यानविषयी अथांग करून दाखवायला.

ज्याच अंतकरण विशुद्ध असेल, ज्याची आकांक्षा उत्तुंग असेल,
दिग्विजयी होण्याच स्वप्न पाहण्यापूर्वी जो स्वतःवर विजय मिळवेल;
मनमोकळ खळाळून हसने शिकाल्यावरही 
ज्याला अश्रू धाळयची लाज वाटणार नाही;
भविष्याचा वेध घेत स्वप्न रंगवतानाही 
ज्याला भूतकाळाच विस्मरण होणार नाही.

एवढ सर्व मिळाल्यावर माझी प्रार्थना आहे 
जगाचा गांभीर्यान विचार करताना 
स्वतःविषयी अतीगंभीर न होण्यासाठी
त्याला विनोदबुद्धीच सामर्थ्य दे.

थोरपणाची जबाबदारी पेलताना 
थोरपानातलं साधेपण लक्षात ठेवण्यासाठी,
ज्ञानी असताना दुराग्रही न होण्यासाठी 
सामार्थ्यातली सेवातत्परता लक्षात ठेवण्यासाठी 
त्याला विनयाच वरदान दे.

असं सगळ झाल तर, मी, त्याचा पिता,
"माझ आयुष्य सार्थकी लागल,
असं पुटपुटायच धाडस करेन."

Wednesday 19 February 2014

शिवजयंती



मी ८वी मधे असताना शिवजयंतीच्या दिवशी दिलेलं हे भाषण. घरी आलो असताना अचानक सापडलं. तेच आज इथे post करतोय.

दिल्लीच्या मुघल सत्तेला हादरा देऊन स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी मानसाचं मर्मस्थळ आहे, मानबिंदू आहे. त्यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाने दिल्लीचे मुघली तख्त हादरवून सोडले व स्वतंत्र हिंदुपतपातशाही निर्माण केली. त्यांच्या ह्या अतुलनीय पराक्रमाची दखल दिल्लिअधिपतिलहि घ्यावी लागली.
ज्या काळी मराठी मातीत सर्वत्र मुर्दाड आणि नि:सत्ववातावरण निर्माण झालं होत, पारतंत्र्य आणि गुलामगिरीविरुद्ध कोणाला आस्था वाटत नव्हती. स्वातंत्र्य गमावल्याबद्दल खेद नव्हता, भूमिपुत्रांना मुस्कटदाबी सहन करावी लागत होती, ‘अस्मानी’ आणि ‘सुलतानी’ला तोंड देत देत रयत पिचली होती, आणि आजचं मरण उद्यावर ढकलत होती. ज्या जनतेला पूर्वी अश्वमेधाच्या घोड्याच्या तपांचा आवाज ऐकण्याची सवय होती, तीच जनता आता घोड्याच्या तपांचा आवाज ऐकताच बिचकत होती. भेदरलेल्या कोंबड्यानसारखी अवस्था झाली होती त्यांची...मरण येत नवत म्हणून जगात होती. मराठी मुलाखतील या प्रस्थापिताला उलथून टाकण्यासाठी जिजाऊनी स्वराज्याविचारांचा पुरस्कार केला आणि शिवरायांच्या द्वारे अमलात आणला.

इतिहासाच्या कालपाटलावर ज्या स्री व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, त्यात अग्रभागी असणार नाव म्हणजे जिजाऊ. सिहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जीजाऊनच्या सावलीत आकारास आलं, हे लक्षात घेतलं की जिजाऊनच्या स्वराज्याकार्याची उंची जाणवते.

शिवरायांनी लहानपणापासून या पिचलेल्या, नडलेल्या रयतेच निरीक्षण केलं. त्यांनी पाहिलं की यांच्यातल पुरुष जरी सुस्त पडलेले असलं तरी संपलेलं मात्र नाही. शिवरायांनी त्यांच्या मनात क्षात्रतेजाचं बीज रोवलं, त्यांच्या सत्त्वाला फुंकर घातली. बारा मावळ फिरून त्यांनी मावळ्यांची फौज उभारली आणि तोरणा जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ केली. त्या भयाण अंधार्या पारतंत्र्यात जगात असलेल्या रयतेच्या मनात स्वातंत्र्याच स्फुल्लिंग चेतवून क्रांतीचा भडका उडवून दिला.त्याचीच परिणीती म्हणजे स्वराज्य! हे मावळे काही पैसे कमावण्यासाठी हा स्वराज्य उद्योग करीत नव्हती तर स्वराज्यविचाराने शिवरायांच्या नेतृत्वाखाली ते एकत्र जमले होते.

संस्कृतमधला एक रसराज कवी पंडित जगन्नाथ त्याचवेळी दिल्लीदरबारात काम करत होता. त्याला जयपूरच्या हिंदू राजाने आपल्याकडे बोलावले तेव्हा त्याने निरोप पाठवला, “दिल्लीश्वरो वा जगदिश्वारो वा मानोरथान पुरायीतुं समर्थ:!” म्हणजे माझे मनोरथ पूर्ण करणारे दोघेच आहे –एक परमेश्वर आणि दुसरा दिल्लीश्वर! बाकी हे भिकारडे राजे मला काय देणार? हा प्रश्न न विचारणारे मावळे शिवरायांनी जन्माला घातले.

शिवछत्रपती जाज्वल्य धर्मनिष्ठ हिंदू होते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्च आहे. मात्र त्यांनी आपलं धर्म कधी हिंदू धर्मांतर्गत ब्राम्हणी कर्मकांडात, रूढी परंपरेत, अज्ञानाच्या गर्तेत अडकू दिला नाही. इस्लाम धर्माचा त्यांनी कधी द्वेष केला नाही. त्यांनी जातपात, धर्म कधी पहिला नाही तर त्यांनी स्वराज्याप्रती फक्त निष्ठा पहिली. असा उदात्त विचार मध्ययुगात देणारे ते एकमेव महापुरुष होते.

महाराजांनी हिंदूंचे अतिरिक्त लाड कधी केले नाहीत आणि अल्पसंख्य या गोंडस नावाखाली कोणाला डोक्यावरही बसवले नाही. ज्यांच्यात कर्तुत्व असते ते लपून राहत नाही; त्यांना अल्पसंख्यांच्या पडद्याआडून पुढे जाण्याची गरज नसते, हे महाराजांनी ओळखले होते.

छत्रपतींनी हे सगळे करीत असताना आपल्या परंपरेवर प्रेम केले, आणि परंपरेतल्या दोषांचा त्यांनी नयनात केला. आपल्या परंपरेमध्ये धर्मांतर झालेल्यांना परत हिंदू धर्मात घेता येत नाही, असे म्हणणारे धर्ममार्तंड होते. मात्र शिवरायांनी ह्या प्रथेचा बिमोड केला. कवी भूषण यांनी शिवरायांचे वर्णन करताना म्हटले आहे,

“कासिहुकी कला गयी| मथुरा मस्जीद भइ|
अगर न होते सिवाजी| तो सुन्नत होती सबकी|”


भावनांच्या जोरावर राज्य चालत नसतात तर त्या बरोबर त्याला कर्तृत्वाची किनार लागते. महाराजांनी स्वराज्याविषयी मावळ्यांमध्ये प्रेम तर निर्माण केलेच मात्र स्वता:ही प्रत्येक लढाइत अग्रभागी राहिले. शाहिस्तेखानाची फजिती, दिल्लीदाराबारातून सुटका, पन्हाळ्याचा वेढा, पुरंदरचा वेध यांसारख्या संकटांची मालिकाच त्यांपुढे उभी होती. मात्र प्रत्येक संकटात महाराज धीरोदात्त पर्वतराजाप्रमाणे निश्चल, स्थिर राहिले.

दृढ स्वराज्याविचार-संकल्पक, कर्तव्यदक्ष प्रशासक, थोये मुत्सद्दी, राजकारण दुरंधर, उत्तुंग कार्यकर्तृत्व आणि मानवतावाद...या त्यांच्या उठून दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे स्वाभिमान आणि करारी बना हे रुपेरी पदर आहेत. स्वजन, स्वधर्म, स्वलोक व स्वाभिमान शिवबांनी कधीही सोडला नाही.त्यांनी कधीहि हे स्वराज्य शिवाजीचे म्हटले नाही तर नेहमीच शाम्भूम्हादेवाचे म्हटले यावरून त्यांची नम्रता दिसून येते.

शिवाजी महाराज धर्मसंस्थापक राजे होते आणि म्हणून त्यांनी संपूर्ण जीवनात कुठल्याही जीवनमुल्यांची अवहेलना केलेली दिसणार नाही. म्हणून त्यांची तुलना सिझरशी , नेपोलीयनशी किंवा लेनिनशी करताच येणार नाही . तुलना करायचीच झाली तर केवळ भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याशीच करावी लागेल. तिसरे नाव मला सापडत नाही. शिवजयंतीच्या या पावन पर्वामध्ये आपल्या अंतरंगामध्ये त्या शिवाजीला जन्म देवूया आणि शिव्छत्रपतींना ह्रिदयसिंहासनावर बसवूया. ज्याने या काळोखाचा भेद केला आणि पुढे कित्येक शतके नव्हे तर कित्येक सहस्रके पुरेल असे दिव्या जीवन आपल्यासमोर ठेवले.

“हे हिंदुशक्ति संभूत दीप्ततम तेजा
हे हिंदू तपास्यापुत ईश्वरी ओजा|
हे हिंदुश्री साम्राज्याभूतीच्या राजा,
हे हिंदुनृसिंहा नमो शिवाजी राजा
तुज नमो नमस्ते| नमो शिवाजी राजा|

नमो शिवाजी राजा|”
जय भवानी! जय शिवाजी!


~दिग्विजय पाटील.