Pages

Friday 19 September 2014

उगवत्या सूर्याच्या देशात - भाग १

गेली बरेच दिवस मी हे लिहिण्याचा विचार करतोय मात्र मी जपानबद्दल लिहायला बसताना नेहमीच मी भारताबद्दल विचार करतो आणि दोन्ही देशातल्या गोष्टींची तुलना करतो. आणि लिहिण्याची उर्मी उरत नाही. हे मी मराठीत लिहिण्याचही कारण तेच आहे. मला भारताबद्दल विचारलं असताना मी माझ्या जपानी मित्रांना आणि ऑफीसमधील सहकार्यांना अनेक भारताबद्दलच्या गोष्टी सांगितल्या. (अर्थात वाईट गोष्टी वगळून) माझ्या गोष्टी सांगण्याच्या कलेमुळे म्हणा किंवा प्राचीन भारतात घडलेल्या चमत्कारांच्या गोष्टी ऐकल्यामुळे म्हणा, त्यांचे भारताबद्दलचे पूर्वग्रह मी काही प्रमाणात शमवू शकलो. पण आता भारतात आल्यानंतर जे आपण त्या लोकांना सांगितलं त्या गोष्टी आता अस्तित्वात नाहीयेत हे पाहून चुकचुकल्यासारख वाटतं.

मी तिथे सार्वजनिक स्थळांवर कचरा शोधण्याचा प्रयत्न केला, मी असफल झालो. मी त्या नवीन जगात एकटा असल्यामुळे मला कोणी लुबाडेल हि सदैव भीती होती, मात्र तसेही काही झाले नाही. भिखारी किंवा टोकाची गरिबी सुद्धा कुठेही आढळली नाही. तिकीट देणारे, सुरक्षा रक्षक, आणि ते सर्व लोक ज्यांच्या आपला संपर्क येतो ती सर्व लोक हसून स्वागत आणि उत्तरं देत होती. सर्वजन इतके आनंदी का असू शकता याचाही मी बर्याचवेळा विचार करत होतो. माझ्या ऑफीस मधील बर्याचजनांना मी विचारलं कि ते त्यांच्या कामावर खुश आहेत का? तर सर्वांनी सकारात्मक उत्तरं दिली. प्रत्येकजन वेळेवर कामावर येत होता आणि उशीर झाल्यास तितका वेळ कामाचे तास संपल्यावर तो काम करत होता.

मी गेलो तेव्हा पावसाळा चालू होता. पण कुठेही पाणी तुंबलेलं मला आढळलं नाही. उघडी गटार दिसली नाही. मुंबई मात्र पहिल्या पावसात हाय खाते. प्रत्येक वस्तूचे भाव ती वस्तू कुठे घेतली तरी सारखेच होते. आपल्याकडे एकाच companyचं पाणी रेल्वे-स्थानकावर एका किमतीत आणि air-port बाहेर दुसर्या किमतीत.

आपण भारतीय आपल्या संस्कृतीचा फार अभिमान ठेवतो आणि ती जगात क्षेष्ठ असल्याचा दावा करत असतो. अर्थात आपण जग पाहिलं नाही त्यामुळे ते कारण साहजिकच आहे. मात्र संकृती म्हणजे तरी काय? एकमेकांशी चांगला व्यवहार करणे हि गोष्ट संकृती आहे. आपल्या बरोबरच इतरांचाही विचार करणे हि संस्क्रूती आहे. पु. ल. देशपांड्यांनी संस्कार या लेखात म्हटलंय कि, “लहान मुलांवर संस्कार म्हटलं कि मध्यमवर्गीयांच्या डोळ्यांपुढे ‘शुभं करोति कल्याणम’, मुंज, देवाची प्रार्थना, इ. गोष्टींपलीकडे ज्ञान होत नाही. वरच्या गॅलरीत लुगडी, चादरी वैगरे वाळत टाकून ती खालच्या मजल्यावरच्या लोकांच्या गॅलरीपर्यंत लोंबू देणे किंवा वेळेचे बंधन न पाळता आपल्यासाठी लोकांना तिष्ठत ठेवणे किंवा पूर्वसूचना न देता कुणाच्याही कडे गप्पांचा अड्डा जमवायला जाने आणि भेटीची वेळ ठरवूनही न जाने – असली वागणूक संस्कार नसल्याची लक्षण आहे हे कोणाला पटलेले दिसत नाही.”

तिथे मी कोणालाही रांग मोडताना पाहिलं नाही. आणि दुसरा प्रसंग असा कि मी टोकयो airportवर असताना Air-India च्या रांगेत gatepass घेण्यासाठी उभा होतो. रांग बरीच लांब होती. अचानक माझ्या पुढच्या मनुष्याला दुरून एका परिवाराने हाथ दिला. त्या मनुष्याशी ‘काय कसकाय’ ह्या गप्पा करता करता हळूच तो पूर्ण परिवार त्यांच्या luggage trolley सोबत मध्ये घुसला. त्यांना मी हटकलं, तर ‘एकसाथ हि हे भैय्या’ म्हणून मला कटवण्याचा प्रयत्न केला. अजून थोडं हटकल्यानंतर तो मला म्हणतो कि ‘आप आगे चले जायीये’. म्हणजे मी शांत व्हावं म्हणून मला तो पुढे जाऊ देणार मात्र मागच्या लोकांचं काय. हि गोष्ट अतिशय साधी पण आपल्या अगदी रक्तात भिनलीय. कुठल्याही रांगेत आपण कधीही स्वस्थ उभे राहू शकत नाही. आणि प्रत्येक रांगेत सर्व मध्ये घूसनार्यांना सांगणे म्हणजे स्वतःला मनस्ताप कारण्या सारखे आहे. मनुष्य पहिले विरोध करतो, उपाय होत नसलेलं पाहून तो ही व्यवस्थेचा भाग होतो.

Traffic signal अतिशय काटेकोर पणे तिथे पाळला जातो. आणि एकाही traffic सिग्नलवर लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी police असलेले मी काही पहिले नाही. स्वयंशिस्त हा प्रकार तिथल्या लोकांना अगदी लहानपणापासून शिकवली जाते. प्रत्येकजण seat belt स्वताची जबाबदारी म्हणून लावतो. (दंड भरण्याच्या भीतीने नाही).

अजून एक प्रसंगात मला हा फरक दिसतो. मी एका आंतरराष्ट्रीय companyमध्ये intern म्हणून होतो. तिथे माझा boss मला वेळ दिलेली असताना अगदी वेळेवर meeting हाल मध्ये असायचा आणि जर कदाचित त्याला काही काम असेल तर मला तसे वेळेपूर्वी G-talk वर message पाठवून द्यायचा. company मध्ये सर्वात छोट्या पदावर असलेल्या नवख्या माणसाचाही जिथे इतका विचार होतो, तिथल्या माणसाच्या जीवनात असलेल्या वेळेच्या महत्वाचं आणखी काय वेगळं उदाहरण द्यावं. मी भारतात परत आलो असताना आमच्या एका प्राध्यापकाने मला माझ्या internship चं presentation देण्यासाठी बोलावलं आतापर्यंत ६ मला वेळ देवून परत पाठवलं. नक्कीच त्यांना काही महत्वाच काम असेल मात्र एकही वेळा त्यांनी पूर्वसूचनेचा mail पाठवला नाही. २ वेळा परत पाठवलं गेल्यानंतर जरा हुशारी आल्यानंतर मी त्यांना सांगितलं कि, “ Sir, Could you please check your schedule and then send me mail about time which preferable to you?” मात्र अजूनही त्यांचा mail काही आलेला नाही.

तिथे कचर्याची ६ प्रकारात विभागणी होते. आठवड्यातील प्रत्येक दिवशी तोच प्रकारचा कचरा घराबाहेरच्या कचरापेटीत टाकायचा. यामुळे कचर्याची विभागणी करण्याचे वेगळे श्रम घ्यावे लागत नाहीत आणि त्याची अतिशय उत्तम प्रकारे विल्हेवाटही लावली जाते. लोकांना असलेल्या शिस्तीच्या अनेक गोष्टी आहेत. तिथे सर्वलोक कुठेही बाहेर जाताना स्वतःचा कचरा टाकण्यासाठी आपल्याबरोबर प्लास्टिकच्या bag ठेवतात. त्या bagला गोमी-बुकुरो म्हणतात. कार, ट्रेन किंवा कशातूनही प्रवास करत असताना आपलं काहीही पदार्थ खाल्यानंतर काय करतो?

तिथे बर्याच प्रमाणात लोक technology शी परिचित आहेत. गमतीची गोष्ट अशी SONY ही Japanese कंपनी असूनही तिथे फार मोठ्या प्रनावरील जनता I-Phone वापरते. अतिशय क्वचित लोकांकडे मी Sonyचा mobile पहिला.
क्रमश: