Pages

Saturday 26 April 2014

उदोउदो अथवा लाथा

हे लिहायला आता तसा फार उशीर झालाय, मात्र परीक्षा असल्यामुळे तेव्हा काही लिहायला जमलं नाही. तेव्हा उशिरा का होईना मात्र हे लिहिणं मला गरजेचं वाटतंय. श्रीलंकेविरुद्ध फायनल मॅचमधे युवराज सिंगचं चांगलं प्रदर्शन झालं नाही म्हणून तुम्ही दगड मारणार त्याच्या घरावर? काही वर्षांपूर्वी कैफचा फॉर्म गेला आणि त्याच्या घरावर डांबर फासलं.




शहीद आफ्रिदी काही वर्षांपूर्वी म्हणाला होता की, आमच्याकडच्या लोकांना फक्त दोनच अवयव आहेत- डोकं आणि पाय. जर मैदानावर चांगला खेळलो तर हे लोक डोक्यावर घेवून उदोउदो करतात आणि जर थोडा फॉर्म बिघडला तर हेच लोक पायाने लाथा घालण्यासही कमी करत नाहीत. तो जे म्हणाला ते आपल्या भारतातल्या लोकांनाही लागू होत नाही का?
खेळात कोणी जिंकणार कोणी हरणारच. मला तुम्हाला दु:ख होणं साहजीकच आहे भारत हरला तर. म्हणून काय तुम्ही मागच्या सर्व गोष्टी विसरून त्याला दोषी मानणार. जेव्हा वर्ल्डकप जिंकला तेव्हा तुम्हीच त्याला डोक्यावर घेवून नाचला होतात, ते लगेच विसरलात का?

अहो जर दगड मारायची इतकीच मस्ती येते तर आजम खान, अबू आझमी सारखे लोक वाच्चाळ गोष्टी करतात तेव्हा त्यांच्या घरावर का मारत नाहीत? अकबरुद्दिन औवेसी सारखा मनुष्य हिंदू-मुस्लिमांना एकमेकांशी लडवन्याच्या गोष्टी करतो तेव्हा का त्याच्या घरावर दगडफेक करत नाहीत? देश विभागनीची आणि समाजा-समाजात ताणताणाव निर्माण करणारी भाषणे निर्माण करणार्यांच्या घरावर का दगड मारत नाहीत? पण नाही. तुम्ही ते मात्र करणार नाहीत. तुमच्या नेत्याच्या विरुद्ध कोणी अपशब्द बोलला तर मात्र तुम्ही शाई, चपला आणि अंडे घेऊन येतात.

संयम नावाचा पदार्थ कशासोबत खातात हे आपल्याला कुठे माहित आहे. नाही का?

Friday 4 April 2014

भगवंताचे मनोगत

आम्ही आपल्याला काही चमत्कार दाखवू या आशेने आपण सगळे माझ्याकडे धावत आलात. आम्ही काही बोललो तरी त्यातून तुम्ही अनेक अर्थ काढतात आणि कीर्तीचा नगारा वाजवीत चारी बाजूला फिरता. या सगळ्या गोष्टी ऐकून दुसरे अनेक लोग माझ्याकडे येतात. अनेक प्रश्न विचारतात. आम्ही जे उत्तर देतो त्यातून आपल्या बुद्धीनुसार नवा अर्थ काढतात व पुस्तके बाहेर काढतात.

या साऱ्या पुस्तकांचा अभ्यास केल्यावर आता आम्ही असे मानायला लागलो आहोत की, चमत्कार दाखवण्याची शक्ती अमच्यापेक्षा तुमच्यात जास्त आहे. कारण आम्ही जे सांगितले ते या पुस्तकांमध्ये नाही. आमच्या नवे तुम्ही हे सारे जगात चालवले आहे तो काय लहान चमत्कार आहे?

एक दिवस मी ध्यानस्थ बसलो होतो. आपण माझ्या दर्शनासाठी आला होतात. त्यावेळी माझ्या कपळी धुळीचा डाग होता. तो पाहून आपण सारे विचार करू लागलात व आपापसात म्हणू लागलात की, ‘गुरुदेवांच्या कपाळावरचे हे चिन्ह पवित्र आहे. आज काही नवीनच आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही सारे कपाळी टिळा लावायला लागलात व इतरांनाही असे सांगायला लागलात की, ‘गुरुदेव असे करतात म्हणून आपणही असे केले पाहिजे.’

परिणाम असा झाला की, तुम्ही मंडळींनी कपाळावर टिळा लावायचे अनेक प्रकार शोधून काढलेत. याविषयी मला कोणी विचारले नाही आणि मी असे करण्याची आज्ञा दिली असे सांगून याचा प्रचार केला. इथेच हा प्रकार थांबला असता तर बरे, पण तुम्ही लोक तर माझ्या कपाळावरही टिळा लावायला लागलात.

हे सारे पाहिल्यावर वाटते की चमत्कार करण्याची शक्ती तुमच्यात जास्ती भरलेली आहे.
एके दिवशी कोणी मला प्रणाम करायला आले होते. प्रणाम करताना त्याच्या खिशातून पैसे पडले. आपण सगळे येऊन म्हणालात: ‘वा:! आज गुरुदेवांनी नवा मार्ग दाखवला. त्यांच्या चरणी पैसे ठेवले पाहिजेत.’ मग तुम्ही सगळे पैसे ठेवायला लागलात. त्या पैशाची व्यवस्था ठेवण्यासाठी तुम्ही लोकांनी एक मंडळ स्थापन केले.

माझी कीर्ती तुम्ही वाढवीतच राहिलात. पैसे जमवितच राहिलात. एके दिवशी मी ध्यानातून उठलो आणि एक नवीनच प्रकार पहिला. माझ्याभोवती चौफेर अंधार पसरला होता. तपास करता कळले की, माझ्या आसपास घर रचण्यात आले आहे. थोड्या वेळात घंटानाद ऐकू यायला लागला व नंतर दरवाजे उघडण्यात आले. एक पुजारीही होता. तो जमलेल्या लोकांना म्हणाला:
‘भगवान जागे झाले आहेत. दर्शन घायचे असेल तर घेऊन टाका.’ सर्वांनी दर्शन घेतले. आता असे झाले आहे की, तुम्ही ज्याला मंदिर म्हणता त्यात मी बंदिवान आहे. मी केव्हा उठावे हे सारे तुम्हीच ठरवता.
हे सगळे पाहिल्यावर तुम्हीच सांगा, माझ्यापेक्षा चमत्कार करण्याची शक्ती तुमच्यात कमी आहे?

 ~"प्रभातपुष्प" मधील उतारा.