Pages

Thursday 10 September 2015

समुद्र - दिग्विजय पाटील



समुद्र...लोक याला कितीही बोल लावतील, नावं ठेवतील, की इतका विशाल असलेला हा समुद्र कोणाचीही तहान भागवू शकत नाही...पण मला हि त्याची निंदा कधीही आवडली नाही. तो नक्कीच तहान भागवत नसेल, पण त्याच्याकडे ओलावा आहे. त्याच्या किनारी एकांतात बसून पहा. तो तुम्हाला स्वतःशी बोलायला लावतो. तुमच्या चुका तुम्हाला शोधायला शिकवतो. तुमच्यातल्या प्रेमाला वात मोकळी करण्याची तो प्रेरणा देतो.

ह्या गोष्टींचा आणि समुद्राचा काय संबंध असावा याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलय. प्रेम, दुख, असूया, इर्षा, आनंद ह्या सर्व भावना किनार्याजवळ बसून त्याच्याशी आपल्या मनातल हितगुज करत असतात. आणि तो प्रत्येकाच्या भावना मूकपने ऐकत असतो. आपलं मन कुणाजवळ मोकळं करण्याची जी प्रत्येक मनुष्याची स्वाभाविक गरज आहे, ती गरज तो पूर्ण करत असतो.

- दिग्विजय पाटील