Pages

Saturday 26 April 2014

उदोउदो अथवा लाथा

हे लिहायला आता तसा फार उशीर झालाय, मात्र परीक्षा असल्यामुळे तेव्हा काही लिहायला जमलं नाही. तेव्हा उशिरा का होईना मात्र हे लिहिणं मला गरजेचं वाटतंय. श्रीलंकेविरुद्ध फायनल मॅचमधे युवराज सिंगचं चांगलं प्रदर्शन झालं नाही म्हणून तुम्ही दगड मारणार त्याच्या घरावर? काही वर्षांपूर्वी कैफचा फॉर्म गेला आणि त्याच्या घरावर डांबर फासलं.




शहीद आफ्रिदी काही वर्षांपूर्वी म्हणाला होता की, आमच्याकडच्या लोकांना फक्त दोनच अवयव आहेत- डोकं आणि पाय. जर मैदानावर चांगला खेळलो तर हे लोक डोक्यावर घेवून उदोउदो करतात आणि जर थोडा फॉर्म बिघडला तर हेच लोक पायाने लाथा घालण्यासही कमी करत नाहीत. तो जे म्हणाला ते आपल्या भारतातल्या लोकांनाही लागू होत नाही का?
खेळात कोणी जिंकणार कोणी हरणारच. मला तुम्हाला दु:ख होणं साहजीकच आहे भारत हरला तर. म्हणून काय तुम्ही मागच्या सर्व गोष्टी विसरून त्याला दोषी मानणार. जेव्हा वर्ल्डकप जिंकला तेव्हा तुम्हीच त्याला डोक्यावर घेवून नाचला होतात, ते लगेच विसरलात का?

अहो जर दगड मारायची इतकीच मस्ती येते तर आजम खान, अबू आझमी सारखे लोक वाच्चाळ गोष्टी करतात तेव्हा त्यांच्या घरावर का मारत नाहीत? अकबरुद्दिन औवेसी सारखा मनुष्य हिंदू-मुस्लिमांना एकमेकांशी लडवन्याच्या गोष्टी करतो तेव्हा का त्याच्या घरावर दगडफेक करत नाहीत? देश विभागनीची आणि समाजा-समाजात ताणताणाव निर्माण करणारी भाषणे निर्माण करणार्यांच्या घरावर का दगड मारत नाहीत? पण नाही. तुम्ही ते मात्र करणार नाहीत. तुमच्या नेत्याच्या विरुद्ध कोणी अपशब्द बोलला तर मात्र तुम्ही शाई, चपला आणि अंडे घेऊन येतात.

संयम नावाचा पदार्थ कशासोबत खातात हे आपल्याला कुठे माहित आहे. नाही का?

No comments:

Post a Comment