Pages

Saturday 7 November 2015

मोहरा इरेला पडला - दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी


बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||

बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला मोहरा इरेला पडला ||२||

तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||

गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||

मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||

वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||

गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला

तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||

- कै. दु, आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून 
- 

15 comments:

  1. खूप वर्षांनी हे गीत सापडलं...छान वाटलं

    ReplyDelete
  2. कोणी याचा अर्थ सांगेल काय?

    ReplyDelete
    Replies
    1. इतके कठीण मराठी आहे???

      Delete
    2. हे गाणे माझी आजी म्हणायची आज तीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

      Delete
    3. फारच छान कविता ,असे कवी परत होणे नाही

      Delete
    4. मला वाटते ८ कडवे होते.नीट आठवत नाहीये पण पूढीलप्रमाणे ----- 'पडघम बिगुलांचे नांदी शिंगे करण्याचे नाद .खाली वरती भरलेला संग्रामांचा उन्माद.अस्मान फेक जातीच्या वेगे चढल्या तोफेच्या.' एवढेच आठवते आहे.कुणाला आठवत असल्यास सांगावे.हे.श

      Delete
    5. संपूर्ण काव्य १० कडव्यांचे आहे..

      Delete
  3. Best Places To Bet On Boxing - Mapyro
    Where 1xbet korean To Bet On Boxing. It's https://vannienailor4166blog.blogspot.com/ a sports betting febcasino.com event https://access777.com/ in which you bet on the outcome of a game. In 출장샵 the boxing world, each player must decide if or not to

    ReplyDelete
  4. माझ्या शाळेतली कविता. विसरले होते. वाचून आनंद झाला.

    ReplyDelete
  5. ही कविता आम्हाला सहावीला साहित्य शोभा पुस्तकात होती.

    ReplyDelete
    Replies
    1. मुंबईकर ,बरोबर ६वीला होती ही कविता. मी ६५साली ६वीला होतो.

      Delete
  6. खूब सूंदर अस्मर्णीय कविता ध्यन कवि दुर्गाप्रसाद तिवारी

    ReplyDelete
  7. हा काव्यसंग्रह कोठे उपलब्ध होईल

    ReplyDelete
    Replies
    1. What's app करा मला मी देतो. ८६००७७१००१

      Delete
  8. ही कविता आम्हाला सहाव्या इयत्तेत (१९६६ साली) 'साहित्य शोभा' या मराठी पंथी पुस्तकात होती.

    ReplyDelete