तडित कडाके उपजे काळ्या कभिन्न मेघोदरी
म्हणुनी का वीज नसे साजरी?
महाविषारी असे खरोखर नागाची ती फणी
म्हणुनी का गरलच वरचा मणी? ||१||
पंकापोटी जन्म पाऊनी सौंदर्ये शोभते
म्हणुनी का कमळ तुच्छ वाटते?
सुरासुरांनी भांडण करुनी सागरास मंथीले
म्हणुनी का अमृत हे नासले? ||२||
शिळा वाळुनी मूळ मुर्तीपरी पंढरीस नांदते
म्हणुनी का भक्ती मंदावते?
जन्मा येणे देवाहाती करणी जग हासवी
गाणे व्यर्थची कुल थोरवी...||३||
~ तडित = वीज, गरल = विष, पंक = चिखल;
~सुरासुरा =
सुर-असुर (देव-दानव); शिळा = दगड
या कवीचे संपूर्ण नाव काय आहे?
ReplyDeleteही कविता फार पूर्वी शाळेत मराठीच्या पुस्तकात होती बहुधा.तुम्हाला आठवतंय का? काही माहिती असल्यास जरूर कळवा.
हो. माझी आई ईयत्ता सातवीत असतांना तिला ही कविता होती. तिला अजुनही ही कविता आठवते.पुर्ण कविता येत नव्हती आईला. ईथे वाचुन खुप आनंद झाला .
Delete