Pages

Friday 15 November 2019

"गारवा" अल्बम मधील कविता : मिलिंद इंगळे

"गारवा" हा मराठीतील अतिशय प्रसिद्ध अल्बम. प्रत्येक गाण्यापूर्वी कवीने आपलं मनोगत काही ओळीत व्यक्त केलंय . त्यातील मला आवडलेल्या काही कविता ह्या ब्लोग मध्ये टाकतोय. पाउस, त्याची असलेली आतुरता, पावसाचा आणि प्रेमाचा असलेला नाजूक संबंध ह्या गोष्टी ह्या संग्रहात अचूक टिपल्या आहेत.

मिलिद इंगळे :गायक आणि संगीतकार 
१)  गारवा 

उन जरा जास्त आहे...दर वर्षी वाटतं
भर उन्हात पाऊस घेऊन...आभाळ मनात दाटतं


तरी पावले चालत राहतात...मन चालत नाही
घामा शिवाय शरीरात...कोणीच बोलत नाही

तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
उन्हा मधला काही भाग पंखांखाली घेतो

वारा उनाड़ मूला सारखा सैरा वैरा पळत रहातो
पाना फूला झाडांवरती छ्परावरती चढूंन पाहतो


दूपार टळून संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हा मागुं चालत येते गार गार कातरवेळ

चक्क डोळयां समोर रुतु कूस बदलून घेतो
पावसाआधी ढ्गां मधे कुठुन गारवा येतो ...


गीतकार :सौमित्र
गायक :मिलिंद इंगळे
संगीतकार :मिलींद इंगळे



२) गारवा.....पहिला पाऊस पहिली आठवण

पहिला पाऊस पहिली आठवण...

पहिलं घरटं पहिलं अंगण
पहिली माती पहिला गंध
पहिलं आभाळ पहिलं रान
पहिल्या झोळीत पहिलच पान

पहिले तळहाथ पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिला पाऊस पहिलीच आठवण
पहिल्या घराचं पहिलच अंगण



३) पाणी झरत चालले

पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले...

पाणी झरत चालले झाड झाडाच्या मीठीत
आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत...

पाणी झरत चालले नदी सागर भरती
वाळू ओलावली सारी दोन्ही किनारयावरती...

पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान
आता किलबिलताहे झाडाझाडातून पाखरं...

पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले...


४) त्याला पाऊस आवडत नाही

त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.


५) बघ माझी आठवण येते का?
मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

६) पाऊस पडून गेल्यावर

पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले

थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या झाडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनी आल्या त्या डबक्यांतील पोरांचे
मोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरती
पाऊस पडून गेल्यावर, या ओल्या रस्त्यावरती
पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्रचिंब भिजलेला
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला
पाऊस पडून गेल्यावर, मन भिरभीरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर, मन गारठता गारवा

- गारवा संग्रहातून साभार 


No comments:

Post a Comment