Pages

Friday 22 August 2014

अश्रूंचा शोध



बर्याचदा लोक सुखाचा संबंध हास्याशी जोडतात मात्र मला चेहऱ्यावरच्या हास्यावर नेहमीच शंका येते. अश्रू हा मात्र आयुष्यभराचा सोबती. आनंदाचा अतिरेक झाला तरी अश्रूच मदतीला येतात, दुःखाचा मार पडला तरी यांचीच साथ.

भावना मोकळ्या होतात त्या अश्रूंनी. हास्य हे बनावती मुखवटा घालून बर्याचवेळा येतं. कुणी अतिशय जवळची व्यक्ती कायमची दूर जाताना तिला निरोप देताना ह्या अश्रूंना लपवत मनुष्य हास्याचा मुखवटा घालतो. अनावर झालेल्या सर्व भावनांचा संबंध तुम्ही ह्या खरात पदार्थाशी जोडू शकता. हा पदार्थ जर आयुष्यात नसला तर आयुष्य नक्कीच बेचव होईल. खरात पदार्थाची किमायच अशी आहे की ते लागते अतिशय कमी प्रमाणात, मात्र त्याचं नसणं तो प्रखरतेने जाणवून देतो.

अनेकवेळा लोक हास्याची तुलना गोड पदार्थाशी करतात. मात्र अती गोड झालं तर डाइबीटीस झालेला मी ऐकलाय मात्र अती खारट आपण प्रयत्नपूर्वकही खाऊ शकत नाही आणि योग्य मात्रेत नाही खाल्लंत तर गलगंडही होण्याचा संभाव असतो.


तर राग माणू नका जर कोणी तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला दु:ख देत असेल, उलट त्याचे आभार माना की त्याने तुम्हाला भावना मोकळ्या करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. आणि तुम्हीही ह्या उपकाराची परतफेड त्याला त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा – चांगल्या पद्धतीने किंवा तुमच्या पद्धतीने. ;-) 

No comments:

Post a Comment