Pages

Wednesday 27 August 2014

जगावं की मरावं हा एकच सवाल


जगावं की मरावं हा एकच सवाल

या दुनियेच्या उकिरडयावर,

खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं, बेशरम, लाचार, आनंदानं की फेकून ध्य़ावं देहाचं लक्तर

त्यात गुंडाळल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या कळ्याशार डोहामध्ये ?

आणि करावा सर्वोचा शेवट एकाच प्रहारानं माझा, तूझा आणि त्याचाही.

मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की

नंतर येणार्या निद्रेला नसावं जागृतीचा किनारा कधीही

पण त्या निद्रेला ही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर ,

तर - तर इथंच मेख आहे .

नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो हे जूने
जागेपण

प्रेताच्या निर्जिवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभार्यात असलेल्या सत्वाची विटंबना

आणि अखेर करूणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मारेकराच्याच दाराशी .

विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला,

आम्ही ज्यानां जन्मं दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसर्या बाजूला,
ज्यानं आम्हाला जन्मं दिला तो तु ही आम्हाला विसरतोस,

मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करूणाकरा,

आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायांवर डोकं आदाळायचं !

श्रध्देनं प्रेरित झालेला माणूस स्वार्थ तृणावत पायदली तुडवितो;

पण श्रध्देची हिफाजत प्राणाची बाजी लावूनही करतो.
राजे आणि सिहासंन उभी राहतात,

अक्षय टिकतात ती केवल अफाट संख्येच्या स्वार्थी- आपमतलबी बाजारबूणग्यांच्या सैन्यबलावर नाही

तर ती उभी राहतात -टिकतात सिंहासनाबद्दलच्या श्रध्देच्या अधिष्टानावर आणि आपल्या नेत्याबद्दलच्या

अपार भक्तिभावावर "

~ शापित राजहंस (अनंत तिबिले)



1 comment:

  1. वरील परिच्छेद हा वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या प्रसिद्ध नाटकातला आहे तरी याची नोंद करावी

    ReplyDelete