Pages

Monday, 9 April 2018

एक होकार दे - वैभव जोशी

एक होकार दे, फार काही नको
फार काही नको, फक्त 'नाहीनको |

एकदा दोनदा ठीक आहे सखे
तुझे लाजणे असे बारमाही नको |

थेट स्पर्शातुनी बोल काहीतरी
गूढ शब्दातली नेहमी मौन ग्वाही नको |

आपले भेटणे हीच एक कोजागिरी
मग चांदणेही नको, चांदवा ही नको |

**

वैभव जोशी 

No comments:

Post a Comment