Pages

Tuesday, 19 November 2019

पत्र लिही पण...- इंदिरा संत


पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून

शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते


कवयित्री - इंदिरा संत

1 comment:

  1. उपक्रम स्तुत्य.पण -हस्व दीर्घ पहा.इंदिरा संतांसारख्या महान कवयित्रीने 'रेषा' हा शब्द रेशा असा लिहीलाच नसता.कवितेचे तिसरे कडवे थोडे वेगळे आहे.तपासून पहा.

    ReplyDelete