Pages

Sunday 2 May 2021

इन्द्र जिमि जंभ पर - कविराज भूषण

कविराज भूषण यांची ब्रज भाषेतील हि कविता आपण बर्याच वेळा ऐकली आहे. माझी आठवण सांगायची तर स्टार-प्रवाहवर २००८ पासून सुरु असलेल्या राजा शिवछत्रपती ह्या मालिकेचा title track हा ह्या गीताने सुरु व्हायचा. तेव्हापासून हे गीत मला पाठ आहे, मात्र त्याचा नेमका अर्थ कळायला बरीच वर्ष गेली. काही दिवसांपूर्वी दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी आणि रणजीतराव हिर्लेकर यांनी त्याचे मराठीत कविता रुपात केलेले भाषांतर सापडले. तेच आज post करतोय.


इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।

पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥

दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।

तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥

- कविराज भूषण

प्रथम याचे प्रत्येक शब्दश: मराठी रूपांतरण बघूया.

[इंद्र जिमि जम्भ पर]
जसा इंद्र जम्भासुरावर (माझलेल्या हथ्थी रूपात),

[बाड़व सुअम्ब पर]
जस वादळ आकाशावर

[रावण सदम्भ पर रघुकुलराज हैं]
जसा राम माझलेल्या दंभी रावाणावर ||१||

[पौन बरिवाह पर]
जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर,

[संभु रतिनाह पर]
जसा शंकर रतीच्या पतीवर (मदनावर)

[ज्यो सहसबाह पर रामद्विजराज हैं]
जसा परशुराम सहस्त्र क्षत्रियांवर ||२||

[दावा द्रुम दंड पर]
जशी विज झाडाच्या कठोर बुंद्यावर,

[चीता मृग झुंड पर]
जसा चीता हरणाच्या कळपावर तुटून पडतो,

[भूषण वितुंड पर जैसे भृघराज हैं]
जश्या भल्या मोठ्या हथ्थिवर सिंह हल्ला करतो ||३||

[तेज तमअंस पर]
जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराच नाश करतो,

[कान्ह जिमि कंस पर]
कृष्ण कंसाचा नाश करतो,

[त्योम म्ल्लेंछ बंस पर सेर सिवराज हैं ]
तसा हे शिवाजी राजा या म्ल्लेंछ वंशाचे कपटी
(मोघल, आदिलशाह, निजामशाह) यांचा नाश करणारा वाघ आहेस.


रणजीतराव हिर्लेकर यांनी केलेला मराठी पद्यानुवाद

जंभासुर दैत्यांवर इंद्र वज्र फेकतो
सिंधुसागरात आग वडवानल ओकतो
दंभी रावणापुढे राम उभा ठाकतो
तुर्कांवर शिवराजा खड्ग तसा घालतो ||1||

जलद जाती पळत पळत प्रगटताच वायु तो
जितेंद्रीय शंकरास तुच्छ मदन बाण तो
शत शत बाहुंस तोडी परशुने राम तो
तुर्क, हशबी, मोंगलांस तैसा शिव तोडतो ||2 ||

सिंह जसा हत्तीचे गंडस्थळ फोडतो
चित्याची झेप हीच हरणांना पेच तो
प्रगटता क्षणी करी वनास खाक अग्नी तो
समरांगणी शिवराजा विर तसा शोभतो ||3||

तेज प्रगटता घनांधकार नष्ट पावतो
कृष्ण चिंतनात कंस मरण रोज भोगतो
महंमदीय वंशाला काळ असा भासतो
सिंहासम छत्रपती शिवराजा शोभतो ||4||

-रणजित रमेश हिर्लेकर , कुणकेश्वर

दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांनी  केलेला मराठी पद्यानुवाद

जंभावरी इंद्र, लंकापतीच्यावरी की जसा जानकीचा पती

मेघावरी वायु, कामावरी की महादेव - ज्याची तपाची रती

दु:शासनाच्या वरी भीम किंवा कन्हय्या जसा दुष्ट कंसावरी

हा भोसले- भूप गाझी शिवाजी तसा भूतली म्लेंच्छ वंशावरी

No comments:

Post a Comment