Pages

Saturday 1 May 2021

सुसंगती सदा घडो - मोरोपंत

सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो
सदंघ्रिकमळी दडो मुरडिता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भवच्चरित्री जडो

न निश्‍चय कधी ढळो कुजनविघ्नबाधा टळो
न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो
स्वतत्त्व हृदयां कळो दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो

नजे प्रियस दोष ते प्रियस दोषही चांगले
स्वतोक पितरा रुचे जरी हि कर दमी रांगले
तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे
जरी मळवीशी रजो मलीन काय तू अंबरे

पिता जरी विटे विटोन जननी कुपित्री विटे
दया मृतर सार्धधी नकुल क:जले त्या किटे
प्रसादपट झाकिती परीपरा गुरुचे थीटे
म्हणोनी म्हणती भले न ऋण जन्मदेचे फीटे

कृतात्त कटका मल ध्वज जरा दिसो लागली
पुर:सर्गता स्वये झगडता तनु भागली
सहाय दुसरा नसे तुज विणे बळे आगळा
लहू जरी उताविळा स्वरी तो कापितो आगळा

दया मृतघना अहो हरीवळा मयुराकडे
रडे शिशुतया सी घे कळवळोनी माता कडे
असा अतिथी धार्मिकस्तुतपदा कदा सापडे
पुन्हा जड भवारणवी उतरिता नदा सापडे

- केकावली काव्यसंग्रहामधून

No comments:

Post a Comment