Pages

Sunday 9 May 2021

मिठी - स्पृहा जोशी

मोग-याची मिठी कोवळया वेदना

 मौन सांगेल सारी कहाणी तुझी,

जो निळावून टाकेल संवेदना

देव कुठला असा घातकी पातकी!

 

मी आणि माझे', 'तुझे तेहि माझे'

तुझ्यासारखा कर्मयोगी नसे,

इथे प्रेमयोगात बेभान आम्ही

आम्हाला उगा त्या 'निळ्या'चे पिसे!

 

अकस्मात सारेच निसटून जावे

हाती तरी तू न येशी कधी

मीरा असो वा असो कोणी राधा

परंतु अखेरीस तू पारधी!

 

तुझ्या काळजाचा कुणी ठाव घ्यावा

तुला काळजाशी धरावे कुणी

खरे सांग वेडी तुझी बासरीही

खंतावते ना अखेरी मनी..??

- स्पृहा जोशी 

No comments:

Post a Comment